Pages DropDown

आमच्या channel ला subscribe करा.

शाळा माहिती चे वेळापत्रक "निकालपत्रक नवीन सुधारित फाईल साठी येथे क्लिक करा." आपल्या आयकर ची गणना आपणच करुया .

गुरुवार, २३ जानेवारी, २०२०

ISRO Summer CampIf any of you kids or your relatives kids studying in 9th or above standards and are interested in science and space, can take part in summer camp organized by ISRO under the  name YUVIKA from May 11- May 22. You can enroll online from Feb 3 to Feb 24. For further details visit
 https://www.isro.gov.in/update/22-jan-2020/young-scientist-programme-2020-–-online-registration

 If selected the kid can opt to report at ISRO centers located in Ahmedabad /Bengaluru /Shillong/ Trivandrum.


बुधवार, ११ डिसेंबर, २०१९

आपला आयकर आपणच वाचवूया.( Save your own Income tax)


आयकर आपणास सद्य स्थितीत करता येणे आवश्यक आहे. काही प्रसंगी आपणास कमी गुंतवणूक केल्यावर जास्त आयकर माफ हि होतो. आपण सद्या ऑनलाईन calculater उपलब्ध करून दिले आहे. सदर गणन पद्धत हि प्रमाणित असेल असे नाही. हा एक सर्वसाधारण नमुना आपणा समोर सादर करीत आहोत.

टीप: या गणन पद्धतीस आदर्श गणन पद्धत म्हणता येणार नाही सदर बबतीत काही शंका असतील तर आपल्या CA शी संपर्क साधावा. या गणन पद्धतीत काही चूक असलेस ती निदर्शनास आणून द्यावी. यावर आधारित कोणताही महत्वपूर्ण किंवा गुंतवणुकीचा निर्णय घेवू नये त्यास सदर वेबसाईट जबाबदार असणार नाही.
 येथून आपण आपला आयकर कसा बचत करू शकतो ते पाहू.यातून नेमका बसणारा tax,असणारी माहिती वरून गणन करता येतो शिवाय आपण सध्या कोणत्या बाबीवर लक्ष केंद्रित करू शकतो यावरही टीप मिळू शकते.

शुक्रवार, २१ डिसेंबर, २०१८

राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धा (सन-२०१८-१९)

राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धा(सन-२०१८-१९)*

 राज्य प्राथमिक शिक्षण परिषद म्हणजेच विद्या प्राधिकरण या शासकीय यंत्रणेमार्फत शिक्षण प्रणाली मधील प्राथमिक स्तरापासून ते उच्च शिक्षणापर्यंत कार्य करणाऱ्या सर्व घटकांच्या साठी नवोपक्रम स्पर्धा आयोजित करण्यात आलेली आहे. सदरच्या स्पर्धेमध्ये पूर्व प्राथमिक पासून उच्चशिक्षण पर्यंत शिकवणारे किंवा सदर क्षेत्रात सृजनात्मक कार्य करणाऱ्या घटकांना सहभागी होण्याची एक नामी सुवर्णसंधी आहे. या स्पर्धेमध्ये पाठवण्याचा जो नवोपक्रम असेल असेल तो स्पर्धकांनी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून टाईप करून पाठवण्याचा आहे.
  http://maa.ac.in/innovation2018-19/

सदर स्पर्धेमध्ये कोण कोण सहभागी होऊ शकतो?


      सदर स्पर्धा पुढील पाच गटात आयोजित करण्यात येत आहे.*

१. पूर्व प्राथमिक स्तरावरील अंगणवाडी कार्यकर्त्या/सेविका व पर्यवेक्षिका
२. प्राथमिक शिक्षक व मुख्याध्यापक३
3. माध्यमिक, उच्च माध्यमिक शिक्षक व मुख्याध्यापक
४. विषय सहाय्यक व विषय साधन व्यक्ती
५. अध्यापकाचार्य व पर्यवेक्षकीय अधिकारी (केंद्रप्रमुख ते शिक्षणाधिकारी व अधिव्याख्याता व वरिष्ठ अधिव्याख्याता)

 नवोपक्रम सादर करण्यास खाली लिंक देण्यात येत आहे*

http://maa.ac.in/innovation2018-19


बुधवार, २४ ऑक्टोबर, २०१८

आपल्या नवीन शाळेचे जुन्या शाळेतून झालेले रूपांतर कसे present करावेत?

खालील व्हिडिओ मधून आपणास हे समजेल कि आपल्या शाळेतील नवीन केलेला बदल आपण एखाद्या व्हिडिओ च्या माध्यमातून कसे present करता येईल हे खालील व्हिडिओ मधून लक्षात येईल.

शुक्रवार, २९ जून, २०१८

Paytm - ऑनलाईन खरेदी, रिचार्ज,बिल आणि बुकिंग आणि परतावा साठी


पेटीएम एक अशी कंपनी आहे जी आपण खरेदी केलेल्या प्रत्येक वस्तूवर आपल्याला कॅशबॅक देते. पण तुम्हाला माहित आहे का?  की पेटीएम वर आपण रिचार्ज बुकिंग बिल भरणे या गोष्टी सुद्धा करू शकतो.  आता आपण पाहू पेटीवर प्रथम आपल्याला काय करणे आवश्यक आहे.

सर्वात अगोदर आपल्या मोबाईल नंबर च्या साह्याने वरती रजिस्टर करणे आवश्यक आहे.  रजिस्टर केल्यानंतर आपण या वेबसाइटवर रिचार्ज तसेच रेल्वे तिकीट बुकिंग करू शकतो. अशा प्रकारच्या व्यवहारावर आपण परतावा सुद्धा मिळू शकतो.  पण परतावा मिळविण्यासाठी आपल्याला पेटीएम वरती केवायसी करणे आवश्यक आहे. केवायसी आपण नजीकच्या पेटीएम सेंटरवर जाऊन करू शकतो.  अशा प्रकारची केल्यानंतर आपण परतावा मिळवण्यासाठी पात्र ठरतो.  तर चला पाहू 

पेटीएम वरती रजिस्टर कसे करावे?

  • प्रथम paytm.com उघडा.
  • त्यावरती रजिस्टर वर क्लिक करा.
  • तुम्हाला मोबाईल नंबर आणि पासवर्ड सुचवण्यासाठी सांगितला जाईल,  तेथे योग्य ती माहिती भरा.
  • ही माहिती भरल्यानंतर तुम्हाला तुमच्या मोबाईल नंबर vr otp मिळेल.
  • हा otp योग्य त्या ठिकाणी टाका तुमचे रजिस्ट्रेशन पूर्ण होईल.


आता खाली तुम्हाला दिसणार या सर्व सुविधांची माहितीवर पूर्ण व्यवहार केले नंतर येणारा सर्व परतावा पेटीएम वालेट वरती मिळेल.  पेटीएम वालेहा आपल्या पाकीट सारखा काम करतो. तुम्ही प्रथम रजिस्टर केले असाल तर तुम्ही केलेल्या व्यवहारावर सुरुवातीला काही परतावा मिळवण्यासाठी कुपन वापरावे लागते असे कृपया आपणास वेगवेगळ्या वेबसाईटवर सुद्धा उपलब्ध असतात.  ते कुपन वापरून तुम्ही तुम्हाला परतावा मिळवू शकता.  एक गोष्ट लक्षात ठेवा काही पण तुम्हाला पेटीएम वरती दिसू शकतात पण काही कुपन असे असतात  जे जास्त परतावा देतात  असे कुपन पेटीएम सुचवत नाही.  अशा प्रकारची खूपच तुम्हाला इतर  वेबसाईट वरती पाहायला मिळतात.

तुम्ही जर सुरूवातीला पेटीएम चे ग्राहक असाल आणि या अगोदर आपण अशाप्रकारचा कुठलाही व्यवहार केला नसेल तर तुमच्यासाठी जास्त परतावा देणारा  फर्स्ट नावाचा coupon code खूप लाभदायक ठरेल.  जो तुम्हाला जास्तीत जास्त परतावा मिळवून देतो. हा कुपन code तुम्हाला रिचार्ज किंवा बिल पेमेंट साठी वापरता येईल.  सध्या हा कुपन code 75 रुपये चा परतावा देतो.
बस बुकिंग:
हा तुम्हाला बस बुकिंग साठी वापरण्यात येणारा पर्याय आहे.  ज्यामध्ये तुम्ही तुमच्या ठिकाणापासून इतर ठिकाणापर्यंत च्या सर्व बसेसचे बुकिंग करून घेण्यास मदत करतो. शिवाय केलेल्या बुकिंग वर तुम्हाला परतावा सुद्धा मिळवून देतो.  काही प्रसंगी हा परतावा 100 टक्क्यांपर्यंत सुद्धा असू शकतो.
लाईट बिल:
आपल्याला दरमहा भरावयाच्या बिलामध्ये लाईट बिल हे अत्यंत महत्त्वाचे फेल आहे हे आपणास भरावेच लागते तर असे  बिल आपल्याला पेटीएम  वॉलेट मधून करता येतो.  या बिलावर सुद्धा काही प्रमाणात परतावा मिळू शकतो.
विमान बुकिंग:
आपल्याला विमानाच्या तिकिटांचे बुकिंग सुद्धा या पेटीएम वालेट करून करता येते.  असे बुकिंग करताna आपण  सुरुवातीचे ठिकाण आणि नंतरचे ठिकाणांची निवड करावी लागते.  निवड केल्यानंतर आपण त्यासाठी आवश्यक असणारा coupon code  वापरल्यानंतर  आपल्याला Coupons वर असणारा विशिष्ट परतावा परत मिळतो.

अशा प्रकारच्या वेबसाईटवर पेमेंट कसे करावे?

पेमेंट करण्यासाठी  कशा प्रकारची पद्धत वापरावी हे जाणून घेण्यासाठी आमची दुसरी पोस्ट  येथे क्लिक करून वाचा.

बुधवार, २७ जून, २०१८

सुरक्षित ऑनलाईन व्यवहार कसे करावेत?ऑनलाइन पेमेंट करण्यासाठी घ्यावयाची काळजी?
आपण सध्या रिचार्ज पासून मोठ मोठ्या वस्तु खरेदी करेपर्यंत आता ऑनलाईन पेमेंट चा वापर जास्तीत जास्त करतो. शिवाय कोणालाही पैसे पाठवण्यासाठी आपण ऑनलाइन पेमेंट चा वापर करतो. तर अशा  ऑनलाइन पेमेंट संदर्भात  हा लेख लिहिण्याचा प्रपंच.

ऑनलाइन पेमेंट नेमके काय आहे?
आपण दोघांमध्ये जो व्यवहार करतो तो व्यवहार पैशाच्या स्वरूपात असेल आणि कोणत्याही पैसे वाहतूक करण्यापेक्षा तो एकमेकाच्या खात्यावर वर्ग करण्याचा इलेक्ट्रॉनिक माध्यम म्हणजे ऑनलाईन पेमेंट.  सध्या अशा पेमेंटचा जास्त बोलबाला आपल्याला पाहायला मिळतो. शिवाय त्याबरोबर पैसे चोरीला जाण्याच्या बातम्याही आपण ऐकत असतो.

पैसे चोरीला जाण्याचे प्रकार नेमके होतात कसे?
सध्या आपण वेगवेगळ्या वेबसाईटच्या लिंक पहात असतो.  त्यामध्ये खूप कमी रकमेचे फरक आहे असे सांगितले जाते.  अशा  प्रकारच्या ऑफर असतात कातर याचे उत्तर आहे असतात.  पण यासाठी ऑनलाईन पेमेंट आपणास करावे लागते.  अशा प्रकारच्या ऑनलाइन पेमेंट आपण क्रेडिट कार्ड डेबिट कार्ड व नेट बँकिंग अशा पद्धतीने वापरत असतो.  आपल्या कार्ड ची माहिती जर कोणाकडे असेल तर तो आपल्या खात्यावरील पैसे काढून घेण्यासाठी प्रयत्न करत असतो.  त्याला आपल्या सिमकार्डवर येणारा otp जर मिळाला तरच तो आपले पैसे काढून घेऊ शकतो अन्यथा तो काढून घेऊ शकत नाही.  काही वेळेस आपणाकडे बँकेतून फोन आला असे भासवून अशा प्रकारची otp ची माहिती विचारली जाते.  त्यावेळी लक्षात घ्यावे की  बँक अशा प्रकारच्या ओटीपी ची माहिती ग्राहकास कधीही विचारत नाही.  अशा अशाप्रकारचा otp आपण जर तिला तर आपल्या खात्यावरील रक्कम चोरीला जाऊ शकते.

ऑनलाइन व्यवहार  करायचा आहे, पण अशा प्रकारची रिस्क घ्यायची नाही?  तर काय करावे?
आपणास अशा ऑनलाईन व्यवहारासाठी एक वेगळे खाते ठेवावे लागेल.  त्यामध्ये जितकी खरेदी करावी तितकीच रक्कम आपण ठेवून असा व्यवहार करू शकतो.  म्हणजे आपले  इतर व्यवहाराचे खाते वेगळे आणि ऑनलाईन व्यवहाराचे खाते वेगळे असे आपल्याला विभागावे लागेल.  त्यासाठी ऑनलाईन व्यवहाराचे खाते हे शून्य ब्यालंस चे खाते म्हणून वापरायचे आहे. नजीकच्या कोणत्याही बँकेत  0 रकमेवरील खात्याची  ऑफर सुरू असेल तर ते खाते निसंकोच सुरु करावे.  ज्यावर आपण फक्त ऑनलाईन खरेदी किंवा इतर ऑनलाईन व्यवहार करणार आहोत.  अशा प्रकारच्या खात्यावरील माहिती जरी कोणाच्याही हातात पडली तरी आपण हे खाते इतर व्यवहारासाठी वापरत नसल्याने अशा प्रकारच्या खात्यावर जास्त ब्यालंस ही नसल्याने कमीत कमी रक्कम आपल्या खात्यातून गेली तरी त्याची जोखीम कमी होते.  आपला इतर खात्यावरील बॅलेंस सुरक्षित राहतो.  ज्या खात्यावरून आपण मोठ्या रकमेचे  व्यवहार करतो त्या खात्यावर तुम्ही सहसा ऑनलाईन व्यवहार करू नये.  तुम्हाला ऑनलाईन व्यवहाराचे सुरक्षिततेचे सर्व नियम माहित होईपर्यंत आपण छोट्या रकमेचे व्यवहार झिरो balance खात्यावरील बँकेच्या माध्यमातूनच करावे.

Recommadation

Blogger Widgets
My Blogger TricksAll Blogger TricksAll Blogging Tips